Home संगमनेर संगमनेरात लसीकरणासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट बंधनकारक

संगमनेरात लसीकरणासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट बंधनकारक

Sangamner Vaccination Antigen Test Compulsory 

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी व्हिडियो कॉन्फरन्स द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत आदेश दिले. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

लसीचा पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. जर ती व्यक्ती बाधित आढळून आल्यास लक्षणे बघून हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल संगमनेर पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप व घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड यांनी तहसील कार्यालायात सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

Web Title: Sangamner Vaccination Antigen Test Compulsory 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here