संगमनेरातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी ६ महिन्यांसाठी हद्दपार
Breaking News | Sangamner: गंभीर गुन्ह्यातील आरोपी अहमदनगर व नाशिक जिल्हयातून सहा महिन्यांसाठी हद्दपार.
संगमनेर: जबरी चोरी, मोटारसायकल चोरी, दरोडा टाकणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे, जखमी करणे असे नऊ गुन्हे दाखल असलेला संगमनेर शहरातील पंपिंग स्टेशन येथील विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर यास अहमदनगर व नाशिक जिल्हयातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
विक्रम उर्फ पिल्या रामनाथ घोडेकर याच्यावर संगमनेर शहर, तालुका व घारगाव पोलीस ठाण्यात नऊ गुन्हयांची नोंद आहे. याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी चौकशी करून हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला होता, त्यानुसार सहा महिन्यांसाठी विक्रम उर्फ पिल्या घोडेकर यास अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईमुळे इतर आरोपींममध्ये धडकी भरली आहे.
Web Title: Sangamner serious crime accused deported for 6 months
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study