Home अहमदनगर सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील अचानक आमनेसामने अन….. काय?

सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील अचानक आमनेसामने अन….. काय?

Ahmednagar Nashik graduate constituency election: Satyajeet tambe and Shubhangi Patil  स्वतः च्या झोळीत मतांचं दानही टाकावे, अशी सादही दोन्ही उमेदवार मतदारांना घालताना.

Satyajeet tambe and Shubhangi Patil are head to Head

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील चर्चेतील दोन्ही उमेदवार  समोरासमोर आल्याचं बघायला मिळालं. विशेष म्हणजे या निवडणुकीवरुन (Election) महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ही निवडणूक सुरु -वातीपासूनच चर्चेत आहे. महाविकास आघाडीने ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठींबा दिलाय. मुळे त्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असल्याचं स्पष्ट झालंय. शुभांगी पाटील यांनी आपल्याला महाविकास आघाडीचा पाठींबा मिळावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या आणि शुभांगी पाटील यांची महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली.

दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली. त्यांना शिक्षक भारती संस्थेने पाठींबा दिला. पण काँग्रेसने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिलाय. या निवडणुकीत शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यात थेट लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान दोन्ही उमेदवार आज समोरासमोर आल्याचं  चित्र बघायला मिळालं.

दोन्ही उमेदवार समोरासमोर कसे?

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सोनई येथे गडाख आणि घुले पाटील यांच्या विवाह सोहळ्यास हजेरी लावली.

यावेळी दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचारार्थ विवाहास उपस्थित विविध नेत्यांच्या, शिक्षक संस्था चालकांच्या तसेच मतदारांच्या भेटी घेतल्या. सत्यजीत तांबे हे विवाह सोहळ्यातून बाहेर पडत असताना तर शुभांगी पाटील विवाह सोहळ्याकडे प्रवेश करत असताना दोघेही समोरासमोर आले. मात्र दोघांनीही एकमेकांकडे बघितल देखील नाही.

आजच्या शाही विवाहास दोन्ही उमेदवारांनी वधू-वरांना शुभ आर्शीवाद दिले. दुसरीकडे स्वतः च्या झोळीत मतांचं दानही टाकावे, अशी सादही दोन्ही उमेदवार मतदारांना घालताना दिसले.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

महाविकास उमेदवार शुभांगी पाटील यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “माझा विजय होणार असल्याने भीती नाही. महाविकास आघाडीचे सर्व नेते सोबत आहेत. माझा विजय नक्की होणारच. मला विवाह सोहळ्यास येण्यास उशिर झाला. मात्र आदित्य ठाकरे यांनी बैठक घेत संस्थाचालकांना सुचना केल्या. त्यामुळे माझ्यासोबत भरभक्कम आशीर्वाद आहेत”, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.

“भाजपच्या नेत्या मोनिका राजळे यांची देखील भेट झाली. नाशिक पदवीधरमध्ये मी एकमेव महिला उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना मदतीची विनंती केली आणि त्यांनी हसत विनंतीला मान दिला”, असं शुभांगी पाटील म्हणाल्या.

Web Title: Satyajeet tambe and Shubhangi Patil are head to Head

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here