Home Maharashtra News SBI च्या खातेधारकांसाठी ‘गुड न्यूज’ ! मुदत ठेवीवर केली व्याजदरवाढ

SBI च्या खातेधारकांसाठी ‘गुड न्यूज’ ! मुदत ठेवीवर केली व्याजदरवाढ

Good news for SBI account holders! Interest rate hike on term deposits

मुंबई : भारताच्या सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने नव्या वर्षात आपल्या ग्राहकांना काहीशी आनंददायी अशी बातमी दिली आहे. शनिवार १५ जानेवारी पासून SBI बँकेने मुदत ठेवी (Fixed Deposit) वरील व्याजदर वाढवले आहेत. पूर्वीच्या व्याजदराच्या तुलनेत ०.१०% ची वाढ करण्यात आल्याची माहिती बँकेकडून त्यांच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

अलीकडेच खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) एफडी वरील व्याजदर वाढवले ​​होते. त्या पाठोपाठ स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील व्याजदरात वाढ केली आहे. कमीतकमी एक वर्ष तर दोन वर्षांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरात ही वाढ केली आहे. बँकेने या कालावधीत असणाऱ्या मुदत ठेवींच्या व्याजदरात १० बेसिस पॉइंट्स म्हणजेच ०.१० टक्के वाढ केली आहे. म्हणजेच आधीच्या ५ टक्क्यांऐवजी आता ५.१ टक्के व्याज दिले जाणार आहे.

एसबीआय ने केलेल्या घोषणेनुसार नवीन व्याजदर १५ जानेवारी २०२२ पासून लागू करण्यात येईल आहेत. नवे व्याजदर २ कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवीसाठी असणार आहेत. किमान एक वर्ष तसेच दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवी ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आता ५.५० टक्क्यांऐवजी ५.६० टक्के व्याजदर मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे बँकेने इतर मुदतीच्या व्याजदरात कोणताही बदल अद्याप केलेला नाही.

Web Title – Good news for SBI account holders! Interest rate hike on term deposits

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here