Home Maharashtra News राज्यात या तारखेपासून होणार शाळा सुरु, मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावास हिरवा कंदील

राज्यात या तारखेपासून होणार शाळा सुरु, मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावास हिरवा कंदील

School start date

मुंबई : मागील काही दिवसांपासून कोरोनाची स्थिती गंभीर स्वरूपाची नसल्याचे निदर्शनास आल्याने सर्वच स्तरांतून पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत मागणी होऊ लागली. त्यामुळे येत्या सोमवारपासून म्हणजेच २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आल्याचे राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं 24 जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. सोमवारी 24 जानेवारीपासून शाळा सुरु होतील. पहिली ते बारावीचे वर्ग सुरु होतील पूर्व प्राथमिक वर्ग देखील सुरु होतील, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसताच जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शाळा आणि महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातून फक्त १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये निर्बंध काहीसे शिथिल करताना राज्यभरात शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आली होती. यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना म्हणजेच लसीकरण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात येण्याची परवानगी देण्यात आली होती. शाळा किंवा कॉलेज सुरू करताना स्थानिक कोरोना परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्तांवर मुख्य जबाबदारी असणार आहे.

Web Title : School starts from Monday? Proposal sent to CM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here