Home संगमनेर संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर शाळेच्या सहलीच्या बसचा अपघात

संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर शाळेच्या सहलीच्या बसचा अपघात

Ahmednagar | Sangamner Accident News: नाशिक पुणे महामार्गावर इगतपुरी येथील शाळेच्या सहलीच्या बसचा गतिरोधकावर अपघात, या अपघातात सात विद्यार्थी जखमी झाले आहेत.

School trip bus accident on Pune Nashik highway

संगमनेर: भरधाव वेगाने जाणारी शाळेच्या सहलीची बस रस्त्यावरील गतिरोधकावर आदळल्याने झालेल्या अपघातात (Accident) सात विद्यार्थी जखमी झाल्याची घटना काल रात्री संगमनेर खुर्द परिसरातील हॉटेल पाहुणचार जवळ घडली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ह्या शाळेच्या मुलांची सहल गेली होती. या सहलीच्या बसचा नाशिक – पुणे महामार्गावरील संगमनेर खुर्द परिसरातील पाहुणचार हॉटेल परिसरात अपघात झाला. अपघाताची माहिती समजतात पहाटे तीन वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव, कर्मचारी विवेक जाधव, शशिकांत दाभाडे, गवळी यांनी तात्काळ जखमी  विद्यार्थ्यांना पोलीस वाहनातून रुग्णालयात नेले.

संदिप शिवाजी कोरडे, रोशन त्र्यंबक चौरे, जय आनंदा टोचे, तेजस शांताराम फोकणे, आदित्य रामभाऊ झनकर, सुरज भिमा म्हस्के, रोशन निवृत्ती शिंदे हअसे जखमी झालेल्या  विद्यार्थ्यांची नावे आहेत.

Web Title: School trip bus accident on Pune Nashik highway

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here