शाळकरी मुलाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू
Ahmednagar News | Rahuri: शेतात गेलेल्या शाळकरी मुलाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने करुण मृत्यू.
कोल्हारः शेतात गेलेल्या शाळकरी मुलाचा पाय घसरून विहिरीत पडल्याने करुण मृत्यू झाला. राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी ६:३० वाजता घडली. ओम योगेश काळे (वय १२ वर्षे) असे मृत मुलाचे नाव आहे. ग्रामपंचायत सदस्या सीमा काळे यांचा तो मुलगा होत. तो इ. ६ वीत शिकत होता. त्याच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
चिंचोली तांभेरे शिवारात शेलार वस्तीजवळ योगेश काळे यांची शेती आहे. या शेतात पाण्यासाठी बोअर घेण्याचे काम चालू होते. वडिलांना पिण्यास पाणी घेऊन ओम चालला होता. पाय घसरल्याने तो विहिरीत पडला. विहिरीला कठडे नसल्याने दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. ओम विहिरीत पडल्याचे पाहताच वडिल योगेश काळे यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली, मात्र दुर्दैवाने चिमुकल्या ओमला वाचविण्यात यश आले नाही.
Web Title: schoolboy died after his foot slipped and fell into a well
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App