Home Accident News Accident: स्कॉर्पिओ आणि दुचाकीत समोरासमोर धडक, एकाच मृत्यू

Accident: स्कॉर्पिओ आणि दुचाकीत समोरासमोर धडक, एकाच मृत्यू

Scorpio and bike collided head-on Accident, killing one

Nevasa | नेवासा: नेवासा शेवगाव राज्यमार्गावरील ज्ञानेश्वर कारखाना पेट्रोल पंपासमोर स्कॉर्पियो व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात(Accident) दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा एक जण जखमी झाला आहे.

शुक्रवारी दुपारी चार वाजता हा अपघात घडला. भेंड्यावरून ता. नेवासा दुचाकीवरून करण जयसिंग सुपेकर  व अर्जुन नवनाथ सुपेकर वय १९ हे दोघे चालले होते. सौंदळ्याकडून येणारी स्कॉर्पियो व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हि धडक इतकी जोरात होती की, करण सुपेकरचा जागीच मृत्यू झाला. तर अर्जुन सुपेकर गंभीर जखमी झाला. त्याला नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत करण याचा मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविचेदन करण्यासाठी नेण्यात आला.  

Web Title: Scorpio and bike collided head-on Accident, killing one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here