संगमनेरात दोन कपड्याची दुकाने सील तर अवैध दारू दुकानांवर छापे
संगमनेर | Sangamner: कोविड काळात जिल्हाधिकाऱ्यानी कडक निर्बंध लागू केलेले आहे. जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन कापड दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच बेकायदेशीर चालविल्या जाणाऱ्या चार दारूच्या दुकानावर स्थानिक प्रशासनाकडून कारवाई केली आहे.
संदीप विष्णू वर्पे यांचे मन मार्केट क्लोथ स्टोअर व बाळासाहेब मुरकुटे यांचे साई शॉपी क्लोथ स्टोअर ही दोन कापडाची दुकाने सुरु असलेली प्रशासनाला आढळून आली. हे दोन्ही दुकाने सील करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तसेच संगमनेर तालुका हद्दीतील कोल्हेवाडी, तळेगाव, नानज दुमाला या गावांमधील चार बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापे टाकत कारवाई केली आहे. दारू विक्रेत्यांकडून १० हजार ६३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Web Title: Seal two clothing shops in Sangamner