Home अकोले अकोले: निळवंडे धरणातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन

अकोले: निळवंडे धरणातून रब्बीसाठी दुसरे आवर्तन

Akole News: निळवंडे धरणातून (Nilwande Dam) एक हजार क्युसेक्स विसर्गाने सुरू.

Second round for Rabi from Nilwande Dam

अकोले: निळवंडे धरणातून आज रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन सोडण्यात आले. जानेवारीच्या अखेरीस भंडारदरा निळवंडे धरणात मुबलक म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी शिल्लक आहे.

भंडारदरा प्रकल्प लाभक्षेत्रासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार रब्बी हंगाम सिंचन व बिगर सिंचन आवर्तन आज सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातून एक हजार क्युसेक्स विसर्गाने सुरू करण्यात आले आहे. रब्बी हंगामातील हे दुसरे आवर्तन असून ते साधारणतः वीस पंचवीस दिवस सुरू राहील.

Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business

आवर्तन सोडतेवेळी ११ हजार ३९ दलघफु क्षमतेच्या भंडारदरा धरणात १० हजार ७४९ दलघफू व ८ हजार ३२० क्षमतेच्या निळवंडे धरणात ७ हजार ३८ दलघफू पाणी शिल्लक होते. म्हणजेच दोन्ही धरणात मिळून जवळपास ९२ टक्के पाणी शिल्लक आहे.

Web Title: Second round for Rabi from Nilwande Dam

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here