Home अकोले निळवंडेतून शेतीसाठी दुसरे उन्हाळी आवर्तन आजपासून सुरू, किती दिवस राहणार सुरु?

निळवंडेतून शेतीसाठी दुसरे उन्हाळी आवर्तन आजपासून सुरू, किती दिवस राहणार सुरु?

second summer cycle for agriculture from Nilwande Dam starts from today

Akole | अकोले:  निळवंडे धरणातून  (Nilwande Dam)लाभक्षेत्रातील शेतीसाठी असणारे दुसरे उन्हाळी आवर्तन आज मंगळवारी( दि १०) सकाळी सहा वाजता सुरू करण्यात आले. १४०० क्यूसेस वेगाने नदीपात्रात हे आवर्तन सुरू करण्यात आले असून २० ते २५ दिवस आवर्तन सुरू राहील. या आवर्तनात तीन ते साडेतीन टीएमसी पाण्याचा वापर होण्याची शक्यता आहे.

११ टी एम सी साठवण क्षमतेच्या भंडारदरा धरणात सध्या ४९७८ दल घ फु पाणी साठा आहे तर ८ टीएमसी निळवंडे धरणात आवर्तन सोडते वेळी ४३१६ दलघफु पाणी साठा शिल्लक होता. या आवर्तनात ३००० ते ३५०० दलघफु पाण्याचा वापर होणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Web Title: second summer cycle for agriculture from Nilwande Dam starts from today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here