Home अकोले सर्वोदयच्या विद्यार्थ्यांची विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड

सर्वोदयच्या विद्यार्थ्यांची विभागीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड

Sarvodaya Vidya Mandir Rajur: जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धा नुकत्याच सावित्रीबाई फुले विद्यालय राहुरी  येथे संपन्न.

Selection of Sarvodaya students for Divisional Judo Competition Rahuri

राजुर: अहमदनगर जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धा नुकत्याच सावित्रीबाई फुले विद्यालय राहुरी  येथे संपन्न झाल्या.  या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी यश मिळविले. यामध्ये ४५ किलो गटात जयश बोऱ्हाडे या प्रथम क्रमांक पटकाविला असून विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तसेच डगळे ओमकार – ५० किलो द्वितीय, चौधरी यश – ४० किलो द्वितीय, चौधरी सार्थक – ४५ किलो द्वितीय, साळवे साक्षी – ४५ किलो द्वितीय, उघडे शारदा – ५७ किलो द्वितीय,  कोंडार पुजा – ४८ किलो द्वितीय या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना जालिंदर आरोटे, विनोद तारू यांचे मार्गदर्शन लाभले.

या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष  मनोहर देशमुख,सचिव टी. एन. कानवडे, संचालक मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Web Title: Selection of Sarvodaya students for Divisional Judo Competition

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here