Home पुणे सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार थायलंड आणि दोन आसाममधील तरुणींची सुटका

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार थायलंड आणि दोन आसाममधील तरुणींची सुटका

Breaking News | Pune Sex Racket: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चार थायलंड आणि दोन आसाममधील तरुणींची सुटका.

Sex racket busted, four Thai and two Assam girls freed

पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा  पर्दाफाश केला आहे.  पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली असून सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे.  यामध्ये  चार तरुणी या थाटलंडच्या आहे. या प्रकरणी स्पा मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशाचं आमिष दाखवून वेश्याव्यावसाय करत असल्याचं समोर आलं आहे.

मॅनेजर शाहरुख अहमद चौधरी (वय 27, रा. जाधवनगर, मुंढवा मुळ रा. जुनिजान ता. जि. हुजाई, आसाम) आणि स्पा मालक सुरेंद्र जगन्नाथ पाटील (वय 32, रा. सुखवानी रॉयल सोसायटी, विमाननगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील कोरेगाव परिसरात ज्वेल स्क्वेअर या ठिकाणी वेश्याव्यावसाय सुरु आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी सापळा रचला आणि पर्दापाश करण्याचं ठरवलं. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने एक फेक ग्राहक पाठवून या ठिकाणी वेश्याव्यावसाय सुरु असल्याची माहिती घेतली. वेश्याव्यावसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर स्पा सेंटरवर छापा टाकला. यात चार थायलंड आणि दोन आसाममधील तरुणी सापडल्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत सहा तरुणींची सुटका केली आणि दोघांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईत 45 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.

Web Title: Sex racket busted, four Thai and two Assam girls freed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here