Home Ahmednagar Live News उच्चभ्रू वस्तीत सुरु होता वेश्या व्यवसाय, पोलिसांची धाड, तीन अटकेत

उच्चभ्रू वस्तीत सुरु होता वेश्या व्यवसाय, पोलिसांची धाड, तीन अटकेत

Sex Racket in Ahmednagar

अहमदनगर | Sex Racket in Ahmednagar: लॉकडाऊन निर्बंध शिथिल होताच व्यवहार सुरळीत होताच अवैध धंधेही जोर धरू लागले आहे. नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात समोर आले आहे.  नगर शहरात दोन ठिकाणी डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून अवैध व्यवसाय करणाऱ्या तिघांना अटक केली आणि तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे.

डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाला उपनगरात सुरु असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती मिळाली. सावेडेतील केडगावमधील अंबिकानगर आणि वाणीनगर या उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे परप्रांतीय महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. ही माहिती मिळाल्यावर पोलिसांनी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी छापे टाकले. सावेडीत टाकण्यात आलेल्या छाप्यात दीपक एकनाथ लांडगे व सागर जाधव यांना अटक करण्यात आली त्यांच्या ताब्यातून एका महिलेची सुटका करण्यात आली. केडगावमधील छाप्यात योगेश पोपट ओव्हाळ (रा. माळीवाडा अहमदनगर ) याला अटक केली आहे. तेथून दोन महिलांची सुटका करण्यात आली. या आरोपींविरूद्ध महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून उपनगरातील उच्चभ्रू वस्तीत भाड्याने फ्लॅट घेऊन महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता.

Web Title: Sex Racket in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here