Home Maharashtra News प्रेमसंबध असल्याचे नातेवाईकांना सांगण्याची धमकी देऊन शारीरिक संबध, गर्भवती राहिल्याने उघडकीस

प्रेमसंबध असल्याचे नातेवाईकांना सांगण्याची धमकी देऊन शारीरिक संबध, गर्भवती राहिल्याने उघडकीस

Sex relationship by threatening to tell relatives that there is a love affair

पुणे | Pune Crime: नात्यातील २० वर्षाच्या मुलाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीबरोबर आपले प्रेमसंबंध असल्याचे सर्व नातेवाईकांना सांगेन अशी धमकी देत तिच्याशी वारंवार शारीरिक संबध (Sex) प्रस्थापित केले. यातून मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी विशाल पिराजी शिकरे वय २० रा. खराडी याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. सदर प्रकार मार्च २०२२ ते २७ मे दरम्यान सुरु होता. याबाबत पिडीत मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादीच्या नात्यातील आहे. त्यामुळे त्याचे घरी येण जाणे होते. त्यातूनच फिर्यादी यांची १५ वर्षाची मुलगी व आरोपी यांच्यात प्रेमसंबध निर्माण झाले. मार्च २०२२ मध्ये घरात कोणी नसताना विशाल घरी आला. त्याने फिर्यादी यांच्या मुलीला आपले प्रेमसंबध असल्याचे सर्व नातेवाईकांना सांगेन अशी धमकी देऊन तिच्याबरोबर शारीरिक संबध (Sexual relation) निर्माण केले. यानंतर तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध (Sex) ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली. याबाबत माहिती फिर्यादी यांना समजल्यावर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुळूक हे करीत आहे.  

Web Title: Sex relationship by threatening to tell relatives that there is a love affair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here