Home Sangamner News संगमनेर: धक्कादायक !  विवाहितेला शेतात नेऊन  हातपाय बांधून अत्याचार

संगमनेर: धक्कादायक !  विवाहितेला शेतात नेऊन  हातपाय बांधून अत्याचार

Sexual abuse by taking a married woman to the field 

Sangamner | संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील कनोली परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सासरी भांडण झाल्याने माहेरी आलेल्या विवाहितेवर तिच्या जवळच्या नातेवाईकाने तिचे हात पाय बांधून शेतामध्ये अत्याचार (sexual abuse)केल्याची घटना घडली आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात पिडीत महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार विलास गुलाब जगताप (रा. बेलापूर ता. श्रीरामपूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील कनोली परिसरातील एका 22 वर्षीय विवाहितेचे सासरी भांडण झाल्याने ती आपल्या माहेरी कनोली परिसरात आली होती.

शुक्रवारी सायंकाळी तिच्या जवळच्या नातेवाईकाने सासरच्या लोकांशी भांडणे कशावरून झाली अशी विचारपूस करण्याचा बहाणा करून या विवाहितेला त्याच्या शेतात नेले. त्याने या विवाहितेचे कपडे काढून तिचे हातपाय बांधून शुटींग काढून ती व्हायरल करील अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार (Sexually Abused) केला. याबाबत सदर विवाहितेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी विलास गुलाब जगताप (रा. बेलापूर ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376(2), (एफ), 384, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक  तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड करत आहेत.

Web Title: Sexual abuse by taking a married woman to the field 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here