Home अहमदनगर धक्कादायक! तरुणीच्या घरात घुसून शारीरिक अत्याचार, व्हिडियो तयार करून  

धक्कादायक! तरुणीच्या घरात घुसून शारीरिक अत्याचार, व्हिडियो तयार करून  

Sexually abuse Rahuri News: धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार.

Sexually abuse by breaking into a young woman's house

राहुरी: एका १८ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार (Sexual abused) केला. तरुणी घरात एकटी असताना हा प्रकार घडला. तसेच या घटनेचा व्हिडियो तयार केला. या घटनेने देवळाली प्रवरा शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, त्यातील पळून जाण्याच्या तयारीत असलेला एक आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोनजण पसार झाले आहेत. या घटनेचा देवळाली प्रवरातील नागरिकांनी निषेध केला असून अन्य दोन आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

याबाबत पीडित 18 वर्षीय तरुणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, फेब्रुवारी 2022 दरम्यान एका दिवशी दुपारी दोन वाजे दरम्यान पीडित तरुणी ही तिच्या घरात एकटीच होती. या संधीचा फायदा घेऊन तीन आरोपी संगनमत करून तिच्या घरात घुसले. आरोपी रवींद्र सरोदे याने तिचा हात धरून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तर दुसरा आरोपी राहुल सरोदे याने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने शारिरीक अत्याचार केला. तर तिसरा आरोपी अनिल लोंढे याने मोबाईलवर व्हिडीओ तयार केला. तसेच तो व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन पुन्हा शरीरसुखाची मागणी केली. बुधवारी रात्री पीडित तरुणीने राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी माहिती घेतली.

पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र दगडू सरोदे, राहुल अनिल सरोदे, अनिल लोंढे तिघे रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी या तिघांवर जबरदस्तीने घरात घुसून शारिरीक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे देवळाली प्रवरा शहर हादरून गेले आहे.

घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा, पोलीस नाईक गणेश लिपने, प्रमोद ढाकणे आदी पोलीस पथकाने या घटनेतील आरोपी राहुल अनिल सरोदे याला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला देवळाली प्रवरा शहर हद्दीत पकडून ताब्यात घेतले. तर रवींद्र सरोदे व अनिल लोंढे हे दोन आरोपी पसार झाले आहेत. राहुल सरोदे याला काल न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा करीत आहेत.

Web Title: Sexually abuse by breaking into a young woman’s house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here