Home Ahmednagar Live News अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिर्डीत एकास अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिर्डीत एकास अटक

Rahata News: १४ वर्ष मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार (Sexually abused) केला.

Sexually Abused a minor girl One arrested in Shirdi

राहाता: शिर्डी शहरातील मध्यवर्ती भागात राहणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला असून पीडित मुलीने आरोपीच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शहाबाज रियाज सय्यद विरुद्ध असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास तातडीने अटक करण्यात आली असल्याची माहिती शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली.

शिर्डी शहरातील श्रीराम नगर येथे टेलरिंगचा व्यवसाय करत असलेल्या शहाबाज सय्यद (वय २४, राहणार शिर्डी) याने जवळच राहणाऱ्या १४ वर्ष मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केला. पीडितेने त्रासाला कंटाळून २५ जुलै रोजी शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुद्ध तक्रार केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीस तातडीने अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी शहाबाज सय्यद याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात बालकाचे लैगिक अत्याचार संरक्षण कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Sexually Abused a minor girl One arrested in Shirdi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here