Home क्राईम बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

Pune Crime: व्यवसायात गुंतवणूक केलेले चार कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार (Sexually abused).

Sexually Abused a woman at gunpoint

पुणे: व्यवसायात गुंतवणूक केलेले चार कोटी रुपये परत घेण्यासाठी घरी गेल्यानंतर आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. . तसेच, या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करुन महिलेला जीवे मारण्याची धमकी देवून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ४८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी जुगनू ऊर्फ शफीक शेख (वय ४५) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या  माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी जुगनू शेख हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी आणि शेख यांच्यात २०२० मध्ये भिशीचा व्यवसाय होता. तो बंद झाल्यामुळे आरोपीने फिर्यादी महिलेला दुसरा व्यवसाय सुरू करू, असे सांगितले. त्यासाठी आरोपीने २०२०-२१ या कालावधीत फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणीकडून वेळोवेळी ४ कोटी रुपये घेतले. परंतु त्यांना काहीही पैसे न देता आर्थिक फसवणूक केली.

फिर्यादी त्यांचे पैसे मागण्यासाठी शेख याच्या कोंढवा येथील घरी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी महिलेला बंदुकीचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केला. इतर आरोपींनी त्यांचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ शूटिंग केले. त्यानंतर पुन्हा आरोपी शेख याने जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Sexually Abused a woman at gunpoint

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here