Home संगमनेर संगमनेर: शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय, पावणे दोन कोटींची फसवणूक

संगमनेर: शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय, पावणे दोन कोटींची फसवणूक

Breaking News | Sangamner Crime: १ कोटी ८३ लाख ६६ हजार इतक्या रकमेची फसवणूक गुन्हा दाखल.

Share trading business, fraud of Rs 2 crores

संगमनेर : ट्रेडिंगचा व्यवसाय करत असे सांगत दिल्लीच्या एकाने तिघांना फसविले. त्यांच्याकडून एकूण ३ कोटी ६८ लाख ७ हजार ७५० इतकी रक्कम घेऊन त्यापैकी १ कोटी ८४ लाख ४१ हजार ७५० इतकी रक्कम परत करीत त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र, १ कोटी ८३ लाख ६६ हजार इतक्या रकमेची फसवणूक केली. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कुशादेव बेझबुराह (रा. दिल्ली) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे.  संगमनेर तालुक्यातील सायखिंडी येथील रहिवासी दत्तात्रय शंकर पवार (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, २०२२ ते २०२३ दरम्यान पवार यांची बेझबुराह याच्याशी ओळख झाली. ट्रेडिंगचा व्यवसाय करीत असून, केलेल्या गुंतवणुकीवर एक-दोन दिवसांत कमीतकमी दहा टक्के परतावा मिळून देतो, असे त्याने पवार यांना सांगितले.

मात्र, पवार यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यानंतर त्याने पवार यांना वारंवार संपर्क करून त्यांना फोन करून अथवा समक्ष भेटून तो करीत असलेल्या ट्रेडिंग व्यवसायाची माहिती द्यायचा. तसेच त्याने ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक कशा प्रकारे नफा कमविला, हे सांगितले. जर तुम्हाला तुमच्या पैशांवर परतावा मिळाला नाही तर त्याची सर्वस्वी जबाबदारी मी घेतो. तसेच खात्री पटावी म्हणून गुंतवणूक केलेल्या रकमेचा माझा धनादेश लिहून देतो, असेही त्याने सांगितले. तसेच पवार आणि इतर दोघांकडूनसुद्धा बेझबुराह याने विश्वास संपादन करून पैसे घेतले. त्याने पवार यांना विश्वासात घेतले. एकूण ३ कोटी ६८ लाख ७ हजार ७५० इतकी रक्कम घेऊन त्यापैकी १ कोटी ८४ लाख ४१ हजार ७५० इतकी रक्कम परत केली. मात्र, १ कोटी ८३ लाख ६६ हजार इतक्या रकमेची फसवणूक केली. जानेवारी २०२३ पर्यंत बेझबुराह हा संपर्कात होता, त्यानंतर त्याने पवार यांचे फोन उचलणे बंद केले आणि त्यानंतर तो कधीही त्यांना भेटला नाही, असेही फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोनल फडोळ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Share trading business, fraud of Rs 2 crores

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here