शिर्डीत कोयत्याचा धाक दाखवत तरुणास लुटले
Breaking News | Shirdi: हातात कोयता घेऊन एका हॉटेल कामगाराला कोयत्याचा धाक दाखवत त्याच्या गळ्यातील चैन, मोबाईल व खिशातील पैसे लुटले.
शिर्डी: गुन्हेगारांनी पुन्हा डोकं वर काढलं असून बुधवारी सहा जणांच्या टोळीने पहाटेच्या सुमारास हातात कोयता घेऊन एका हॉटेल कामगाराला कोयत्याचा धाक दाखवत त्याच्या गळ्यातील चैन, मोबाईल व खिशातील पैसे लुटले.
शिर्डी भाजी मंडई जवळील असलेल्या भरवस्तीत एका हॉटेलवर ही घटना घडली. घटनेचा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे शिर्डीत दहशतीचे वातावरण तयार झाले असून शिर्डीतील वाढती गुन्हेगारीमुळे भाविकांमध्येही भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पोलिसांनी सीसीटिव्ही चित्रीकरणाच्या आधारे सहाही आरोपींना ओळखले असून हे आरोपी शिर्डीचे स्थानिक सराईत गुन्हेगार आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच शिर्डी पोलिसांच्या तीन टीम आरोपींचा शोध घेत आहेत.
शिर्डीत जुगार, गावठी कट्टा बाळगणे, दुचाकी, चारचाकी, गंठण चोरीचे प्रकार सर्रास सुरू असून वाढत्या गुन्हेगारीला अवैध व्यवसाय कारणीभूत आहे. शिर्डीतील गुन्हेगारीमुळे वाढत्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तात्काळ उपायोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. शिर्डीत बुधवारी हॉटेल कामगाराला कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून गळ्यातील चैन, मोबाईल व पैसे चोरून नेले. या प्रकरणी शिर्डी पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
Web Title: Shirdi, the young man was robbed showing fear of coyote
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study