Home पुणे शिरूर तालुक्यात कुऱ्हाडीने घाव घालत युवकाचा खून

शिरूर तालुक्यात कुऱ्हाडीने घाव घालत युवकाचा खून

Shirur Crime: कुन्हाडीने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना.

Shirur taluka youth was Murder by ax injury

शिरूर:  कुन्हाडीने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील एका फार्महाऊसमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिसांनी केला आहे. खुनाचा गुन्हा दाखल

अत्ताउल्ला ऊर्फ मोईन शाबीर खान (वय २२ रा. चेंबूर, मुंबई) असे मृताचे नाव असून, शहीद रफिक बागवान (वय २१ रा. वडनेर खुर्द ता. शिरुर) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास विष्णू मोकाशी यांनी फिर्याद दिली आहे. वडनेर खुर्द येथील जाकीर सय्यद यांच्या फार्महाउसमध्ये शहीद बागवान व अत्ताउल्ला ऊर्फ मोईन खान हे दोघे असताना त्यांच्यात वाद झाला.

दरम्यान शहीद याने कुन्हाड घेऊन अत्ताउल्लाच्या डोक्यात, मानेवर, कपाळावर वार केले. यात अत्ताउल्ला खान याचा मृत्यू झाला. याबाबत देविदास मोकाशी यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी शाहीद बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले, पोलीस अंमलदार दीपक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Shirur taluka youth was Murder by ax injury

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here