Home Crime News निंदनीय : Shivsena विभागप्रमुखाला महिलेने दिला चपलीचा चोप

निंदनीय : Shivsena विभागप्रमुखाला महिलेने दिला चपलीचा चोप

Shivsena

विरार : विरार पूर्व साईनाथ नगर येथील शिवसेना (Shivsena) विभाग प्रमुखाला एका महिलेने चपलेने चांगलंच चोपले आहे. जितू खाडे असं या शिवसेना विभाग प्रमुखाचे नाव असून त्याला रिक्षातच एका महिलेनं चोप दिला आहे. फोन कॉल वरून सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. याच कारणानं संतप्त महिलेने जितू खाडे याला भररस्त्यात रिक्षामध्ये चपलेने चोपले. या घटनेचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार देखील दाखल करण्यात आली असून सध्या जितू खाडे हा फरार असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

‘आईटम चाहिए?’ असं म्हणत एक महिलेने शिवसेना विभाग प्रमुख असलेल्या जितू खाडे याला रिक्षातच मारायला सुरुवात करते असे व्हिडिओ मध्ये दिसून आले आहे. पीडित महिलेने जितू खाडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फोन कॉल करून सेक्ससाठी महिलांची मागणी जितू खाडे करत होता असा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला संशयित आरोपी जितू खाडे हा सध्या फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सध्या त्याचा शोध घेतला जात असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दरम्यान या संपूर्ण घटनेप्रकरणी शिवसेनेचे पालघर उपजिल्हा प्रमुख दिलीप पिंपळे यांनी या कृतीचा निषेध केला आहे. तसेच जितू खाडेच्या कृतीला आमचा पाठिंबा नसून वरिष्ठांशी बोलून त्याच्यावर लगेच कारवाई केली जाणार असं त्यांनी सांगितलं आहे. एकूनच या प्रकरणात शिवसेना विभाग प्रमुखाचे नाव आल्याने पक्षाकडून जितू खाडेवर काय कारवाई होते हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे.

Web Title : Shiv Sena activist beaten by woman in Virar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here