तरुणीच्या अत्याचार प्रकरणी शिवसेनेच्या उपनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
पुणे | Pune Crime: पुण्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी 24 वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी शारिरीक संबंध (sexual relation) ठेवल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारिरीक संबंधामूळे तरुणी गरोदर असल्याचे तिच्या मेडिकल रिपोर्टमध्ये दिसून आले आहे. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करुन तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक याच्या विरोधात पोलिसात बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या सर्व प्रकारानंतर डेक्कन परिसरातील हॉटेलमध्ये फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयन्त या तरुणीने केला. काही दिवसांपूर्वी पीडित 24 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. पीडित तरुणीनं फिर्यादीत म्हंटले आहे की, गोव्यातील बेलीझा बाय दी बीच हॉटेल, मॉडेल कॉलनीतील प्रबोधन फाऊंडेशन, प्राईड हॉटेल 6 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 दरम्यान हा प्रकार घडला होता.
फिर्य़ादीनूसार शिवसेनेचे उपनेता रघुनाथ बबनराव कुचिक यांचे पीडित तरुणीसोबत प्रेम संबध होते. या संबंधातून पीडित तरुणी गरोदर राहिली. त्यांनी तरुणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी शारिरीक संबंध ठेवले. गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीने तरुणीला गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल कुठेही काही सांगितल्यास वाईट परिणाम भोगायला लागतील अशीही धमकी तरुणीला देण्यात आली. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
Web Title: Shiv Sena deputy leader charged with rape