Home Breaking News धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या

धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या

Breaking News | Kalyan Crime: जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्रांनी हल्ला करुन ही निघृण हत्या करण्यात आली.

Shiv Sena Shinde faction office bearer murdered

कल्याण: कल्याणमध्ये तालुक्यातील मुरबाड महामार्गावरील मामणोली गावाजवळ जुन्या वैमनस्यातून धारदार शस्त्रांनी हल्ला करुन ही निघृण हत्या करण्यात आली आहे. किरण घोरड असे हल्ल्यात मृत झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचे नाव असून तो टिटवाळ्यातील गोवेली गावचा रहिवासी होता.

दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार, टोळक्याने राडा घालत किरण घोरड यांच्यावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेनंतर किरण घोरड यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्याच आले, मात्र, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Breaking News: Shiv Sena Shinde faction office bearer murdered

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here