Home भारत Goa Election : शिवसेनेची ऑफर उत्पल पर्रिकरांनी दुर्लक्ष केली

Goa Election : शिवसेनेची ऑफर उत्पल पर्रिकरांनी दुर्लक्ष केली

Utpal Parrikar

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपाने पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या ऑफरबाबत विचारले असता उत्पल पर्रिकर यांनी, आपण या ऑफरचा विचारही करू शकत नाही, असे सांगत या ऑफर स्पष्ट शब्दात फेटाळून लावल्या आहेत.

उत्पल पर्रिकर म्हणाले की, मला माझ्या पक्षाने दिलेल्या ऑफरही मी विचारात घेतल्या नाहीत. मग इतर पक्षांनी दिलेल्या ऑफरचा मी विचारही करू शकत नाही. मला लोकांना पर्याय द्यायचा आहे. मी स्वतःसाठी पर्याय मागत नाही, असे उत्पल पर्रिकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान, भाजपा सोडणार का? अशी विचारणा केली असता उत्पल पर्रिकर यांनी भाजपा माझ्या रोज मनात असेल, असं सांगितलं. मी पक्षाला नाही पक्षाने मला सोडलंय, तुम्ही त्यांनाच विचारा असं ते यावेळी म्हणाले. तसेच उत्पल पर्रिकर यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सध्या मात्र दिलेला आहे.

पणजीतूनच निवडणूक लढवण्यावर ठाम

भाजपाचे ज्येष्ठ नेते स्व. मनोहर पर्रिकर हे पणजी मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. मात्र त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पणजी मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. तर काँग्रेसचे बाबुश मोन्सेरात विजयी झाले होते. मात्र नंतर मोन्सेरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी न देता मोन्सेरात यांनाच पक्षाची उमेदवारी जाहीर केली.

उत्पल पर्रिकर यांना पणजीऐवजी इतर मतदारसंघातून लढण्याचा पर्याय पक्षनेतृत्वाने दिला. मात्र उत्पल पर्रिकर पणजीतूनच निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अखेरीस त्यांनी पक्षातून बाहेर पडत कोणत्याही पक्षशिवाय पणजीतूनच अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. गोव्यात शिवसेना पक्ष आपले खाते उघडू इच्छितो मात्र शिवसेनेची ऑफरकडे उत्पल पर्रिकरांनी साफपणे दुर्लक्ष केले आहे.

Web Title : Shiv Sena’s offer was rejected by Utpal Parrikar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here