Home अहमदनगर अहिल्यानगर: शिवशाही बसला अचानक आग, जळून खाक

अहिल्यानगर: शिवशाही बसला अचानक आग, जळून खाक

Ahilyanagar Bus Fire: दुरूस्तीचे काम सुरू असताना शॉर्टसर्कीट झाल्याने शिवशाही बसला अचानक आग लागून तिने पेट घेतला. यात ही बस जळून खाक झाली.

Shivshahi bus suddenly caught fire, burnt down

कोपरगाव: कोपरगाव बस स्थानकाशेजारीच असलेल्या आगारात दुरूस्तीचे काम सुरू असताना शॉर्टसर्कीट झाल्याने शिवशाही बसला अचानक आग लागून तिने पेट घेतला. यात ही बस जळून खाक झाली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. त्यामुळे बस स्थानाकात मोठा गोंधळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार,  कोपरगाव आगारात अनेक बस उभ्या असतात. काही बसच्या दुरूस्तीचे काम सुरू असते. शुक्रवारी रात्री देखील शिवशाही बसच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी शॉर्टसर्कीट झाल्याने बसच्या कॅबीनला आग (Fire) लागली. तात्काळ आगीने रौद्ररूप धारण केले. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे व कोपरगाव नगर परिषदेचे अग्नीशमन बंब घटनास्थळी पोहोंचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

अर्ध्यातासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तोपर्यंत बस पूर्णपणे जळाली होती. यावेळी बस स्थानकातील प्रवासी, शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. कोपरगाव आगारातील वर्कशॉपच्या जवळच डीझेल पंप आहे. सुदैवाने इतर बसेसला आगीने विळख्यात घेतले नाही. डीझेल पंपापर्यंत आग पर्यंत पोहोंचली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

Web Title: Shivshahi bus suddenly caught fire, burnt down

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here