असे काय झाले की, आईनेच आपल्या चार वर्षांचा मुलास संपवले
आईने आपल्याच चार वर्षांच्या मुलाचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना.
पुणे: गुन्हेगारीचा कळस झालेली धक्कादायक घटना जेजुरीमध्ये समोर आली आहे. आई आणि मुलाच्या नात्यास काळीमा लावणारी ही घटना घडली आहे. या घटनेत आईने आपल्याच चार वर्षांच्या मुलाचा जीव घेतला आहे. या धक्कादायक घटनेमुळे सर्वच लोकांना धक्का बसला आहे. याबाबत पोलिसांच्या तपासात हत्येचे कारण स्पष्ट झाले आहे.
जेजुरी येथील मोडलिंब येथे राहणाऱ्या रेणू शंकर पवार या महिलेने तिचा मुलगा चुटक्या हिची गळा दाबून हत्या केली. रेणू पवार हिचे उमेश अरुण सांळुके यांच्याशी प्रेमसंबध होते. या प्रेमात तिला चुटक्याचा अडथळा येत होता. यामुळे आईने तिच्या मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. चुटक्या मिळत नसल्यामुळे रेणू पवार हिच्या चुलत बहिणेने पोलिसांकडे तक्रार केली होती.
चार वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला. यासंदर्भातील फिर्याद पोलिसांकडे आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. रेणू पवार हिची चौकशी सुरु केली. तिच्या बोलण्यात विसंगती आढळली. तिला पोलिसांचा खाक्या दाखवताच तिने सगळा प्रकार कथन केला. प्रेमात अडथळा येत असल्यामुळे तिने खून केल्याचे कबुल केले.
मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह साडीत गुंडाळून माळशिरसजवळील घाटात फेकून दिला. ही घटना दीड महिन्यांपूर्वी घडली होती. या खून प्रकरणात पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे यांनी दिली.
Web Title: Shocking incident of a mother murder her own four-year-old son
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App