Home Ahmednagar Live News अहमदनगर वाळू तस्करी : गावातील तरुणांवर भर चौकात गोळीबार

अहमदनगर वाळू तस्करी : गावातील तरुणांवर भर चौकात गोळीबार

sand smuggling

अहमदनगर : वाळू तस्करीतून शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे भर सकाळी 10 वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी भर चौकातच गावातील तरुणांवर गोळीबार केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा शेवगाव तालुक्यातील वाळू तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शेवगाव तालुक्याच्या हद्दीवरून गोदावरी नदीचा वाहता प्रवाह आहे. या नदी पात्रातून चोरी छुप्या पद्धतीने बेसुमार वाळू उपसा सुरू असतो. या वाळूच्या तस्करीतून अनेकवेळा दोन गटात मारामार्‍या, जाळपोळ व खुनासारख्या घटना घडल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण असते.

आज सकाळी 10 वाजता चापडगाव येथे दुचाक्यांवरून चार तरुण आले होते. भर चौकातच गावातील एका तरुणावर यातील एकाने गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. ही गोळी चापडगाव येथील तरुणाच्या हाताला चाटून गेली. तर त्या तरुणांनी हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने चापडगावसह शेवगाव तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

Web Title : Shooting in Shevgaon taluka due to sand smuggling

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here