अहमदनगर: 10 रुपयाच्या फाटक्या नोटवरुन जाळलं दुकान; आरोपीला अटक
Breaking News | Ahmednagar: 10 रुपयांच्या फाटक्या नोटावरुन झालेल्या वादातून चक्क दुकानच जाळल्याची धक्कादायक घटना.
अहमदनगर : 10 रुपयांच्या फाटक्या नोटावरुन झालेल्या वादातून चक्क दुकानच जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोठी रोडवरील ही घटना आहे. दुकानदाराने दहा रुपयांची फाटकी नोट न घेतल्याचा राग मनात धरून एकाने चक्क दुकानच पेटवून दिल्याचे समोर आले आहे.
रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास कोठी रोडवरील हॉस्पिटलसमोर ही घटना घडली. याप्रकरणी विजय दिलीप झेंडे (रा. नगर कॉलेजजवळ, नगर) यास कोतवाली पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडीही देण्यात आली आहे.
याप्रकरणी रंजना अजय बसापुरे (रा. माळीगल्ली, केडगावेस, नगर) यांनी फिर्याद दिली होती. अहमदनगर-पुणे रोडवरील कोठी येथे रंजना बसापुरे यांच्या मालकीचे महावीर दूध डेअरी व जनरल स्टोअर्स आहे.आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्या डेअरी व जनरल स्टोअर्सचे दुकान चालवतात. याप्रकरणातील आरोपी विजय झेंडे हा दुपारी त्यांच्या दुकानात आला होता. त्यावेळी, त्याने खिशातून दहा रुपयांची नोट दुकानदार महिलेस दिली. मात्र, ही नोट फाटकी असल्याने दुकानदाराने ती घेण्यास नकार नाही. दुकानदाराने 10 रुपयांची फाटकी नोट घेण्यास नकार दिल्याने ग्राहक व दुकानदारामध्ये बाचाबाची झाली.
आरोपी विजयने फाटकी नोट न घेतल्याच्या कारणावरून झालेला वाद मनात ठेवला. त्याच दिवशी रात्री 10 वाजताच्या सुमारास आरोपी दुकानात आला व त्याने ऑइलच्या सहाय्याने संबधित दुकानाला आग लावली. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, दुकानदाराचे 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.
Web Title: shop burnt over a torn 10 rupee note The accused was arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study