अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करा – भांगरे
अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करा – भांगरे
भंडारदरा :अकोले तालुक्यातील भंडारदारा धरणाच्या पाणलोटात ६०-७० दिवसांपासनु सुरु असलेले पावसामुळे आदिवासी बांधवांच्या भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असुन शासनाने त्वरीत ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठे नेते अशोकराव भांगरे यांनी केली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलेट क्षेत्रामध्ये यावर्षी पाऊस उशिरा दाखल झाला होता. परंतु एकदा सुरे झाल्यानंतर त्यांन थांबवण्याचे नावच घेतले नाही. आत्तापर्यंत भंडारदरा धरणाच्या पाणलोटात एकटया घाटघरमध्ये १३२५ इंच पावसाची नोंद झाली असुन धरणामध्ये तब्बल १६५९३ दलघफु आजतागायत नवीन पाण्याची आवक झाली आहे.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
त्यातच भंडारदरा धरणाच्या पाणलोटात आदिवासी बांधवांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी भतशेती पाण्याखाली गेली आहे. रतनवाडी, साम्रद , घाटघर, मुतखेल, कोलटेंभे आदी गावांसह भंडारदरा परिसरात कित्येक आदिवासी शेतकऱ्यांची भाताची लागवडच मुळापासुन सडुन गेली असल्याने त्यांना आत्ताच भविष्यांची चिंता जाणवु लागली आहे. कितीतरी शेतामध्ये पावसामुळे शेवाळ तयार झाले आहे. तर काही बांधवांचे भात शेतीचे बांधच वाहुन गेले आहे.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.