जिलेटिनच्या काड्याचे स्फोटके व डेटोनेटरचे बॉक्स बाळगणाऱ्यास अटक
Ahmednagar News Live | Shrigonda Crime | श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिलेटिनच्या काड्याचे स्फोटके व डेटोनेटरचे बॉक्स असा 40 हजाराचा मुद्देमाल जप्त करत आरोपीस ताब्यात घेतले.
देवेंद्र प्रल्हादचंद शर्मा (वय 30 रा. बाडी ता विजयनगर जि-अजमेर,राजस्थान, ह. रा. भानगाव ता श्रीगोंदा जि अहमदनगर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीमध्ये घारगाव शिवारामध्ये जिलेटिनच्या काड्या व डीटोनेटर विनापरवाना व बेकायदेशीररित्या वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगावमध्ये जाऊन सापळा लावला. काही वेळात तिथे दुचाकीवरून आलेल्या एकास पोलिसांनी नाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवेंद्र प्रल्हादचंद शर्माअसे असल्याचे सांगितले.त्याच्या अंगाची झडती घेतली असता मोटर सायकलची झडती घेतली असता मोटरसायकलवर एका पांढऱ्या गोणीमध्ये व डीकीमध्ये एक 39 हजार 650 रुपयांचा मुद्देमालामध्ये जिलेटिन व डीटोनेटर अशा वस्तू मिळून आल्या.
स्फोटके 2 पंचा समक्ष पंचनामा करून माला पैकी एक जिलेटिन व प्रत्येकी बॉक्स मधून प्रत्येकी दोन डेटोनेटर तपासणी करून घेऊन त्या आरोपीस मोटरसायकल सह व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. याबाबत गुन्हे शाखेचे पोहेकॉ बबन मखरे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Shrigonda Crime against carrying gelatin sticks and detonator boxes