Home Ahmednagar Live News Murder: पतीने पत्नीवर कुर्‍हाडीने वार करत केली हत्या

Murder: पतीने पत्नीवर कुर्‍हाडीने वार करत केली हत्या

Shrigonda Murder Husband stabs wife to death

Ahmednagar: | श्रीगोंदा | Shrigonda: तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथे एका मनोरुग्ण पतीने 57 वर्षीय पत्नीवर कुर्‍हाडीने वार करून खून (Murder) केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

संगीता रोहीदास पंदरकर असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती रोहिदास पंदरकर हा पोलीस पाटील शिवणकर यांच्यासोबत स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

दरम्यान रोहिदास हा मनोरुग्ण असून मागील काही वर्षांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, पिंपळगाव विसापूर रस्त्यावरील पंदरकर मळ्याच्या शिवारात रोहिदास पंदरकर आपल्या पत्नी मुलांसोबत सोबत वास्तव्यास होते.

शनिवारी पहाटे 4 ते 4.30 वाजेच्या सुमारास पत्नी संगीता पंदरकर हिच्या गळ्यावर धारदार कुर्‍हाडीने वार केले. यामध्ये संगीता पंदरकर गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. सकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव पिसाचे पोलीस पाटील सुनील शिवणकर यांनी बेलवंडी पोलीसांना सदर घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक बोत्रे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करुन पोलीस पंचनामा केला. खूनाचे कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र कौटुंबिक कारणामुळे खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रोहिदास याला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Shrigonda Murder Husband stabs wife to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here