Home Maharashtra News भारताशेजारील या देशात पेट्रोल 50 तर, डिझेल 75 रुपयांनी महागले

भारताशेजारील या देशात पेट्रोल 50 तर, डिझेल 75 रुपयांनी महागले

Shrilanka Petrol Price Hike

Shrilanka Petrol Price Hike : इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या श्रीलंकास्थित उपकंपनीने श्रीलंकन नागरिकांना पेट्रोल डिझेल दरवाढीने मोठा धक्का दिला आहे. भारतात देखील येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता अनेक जाणकरांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भारतातही यावरून चर्चा रंगत आहे.

भारताच्या शेजारी देश श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ऐतिहासिक वाढ (Historical Hike) पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी (दि. ११), श्रीलंकेतील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या उपकंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली, जी आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

कंपनीने पेट्रोलच्या किरकोळ किमतीत ५० रुपये आणि डिझेलच्या दरात ७५ रुपयांनी वाढ केली आहे,  त्यानंतर श्रीलंकेत पेट्रोलची किंमत प्रति लिटर २५४ आणि डिझेलची किंमत प्रति लिटर २१४ रुपयांवर पोहोचली आहे.

श्रीलंकन ​​रुपयाच्या प्रचंड अवमूल्यनामुळे कंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती वाढवल्या असल्याचे समजते आहे. एका महिन्यात कंपनीने तिसऱ्यांदा इंधनाचे दर वाढविले आहेत.

एलआयओसी (LIOC)ला श्रीलंका सरकारकडून (Shrilanka Government) कोणतेही अनुदान मिळत नाही. एलआयओसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज गुप्ता यांनी या बाबत मोठी माहिती दिली आहे. ते म्हणाले, सात दिवसांत, श्रीलंकन (Shrilanka) ​​रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ५७ रुपयांनी घसरल्याने त्याचा थेट परिणाम तेल आणि पेट्रोल उत्पादनांच्या किमतीवर झाला.

Web Title: Shrilanka Petrol Price Hike

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here