Home Ahmednagar Live News पल्सर मोटारसायकल लिंबाच्या झाडावर धडकून दोघे तरुण ठार

पल्सर मोटारसायकल लिंबाच्या झाडावर धडकून दोघे तरुण ठार

Shrirampur Accident motorcycle hit a lemon tree, killing the two young men

Ahmednagar News Live | Shrirampur Accident | श्रीरामपूर: श्रीरामपूर बाभळेश्वर रस्त्यावर प्रभात दुध डेअरी जवळ एक पल्सर झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

श्रीरामपूर बाभळेश्वर रस्त्यावर प्रभात डेअरी जवळ भरधाव वेगातील पल्सर दुचाकीवरील एमएच १७ बीयु ७६३३ लिंबाच्या झाडाला धडकली. या अपघातात दुचाकीस्वर सद्दाम शेख वय २५ व त्याचा मित्र शुभम पतंगे वय १९ हे दोघे जागीच ठार झाले. तर कुमेल जुनानी हा तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक साईनाथ राशिनकर यांच्या फिर्यादीवरून मयत दुचाकीस्वार शेख याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shrirampur Accident motorcycle hit a lemon tree, killing the two young men

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here