Home Ahmednagar Live News लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने अहमदनगर जिल्ह्यात उडाली खळबळ

लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने अहमदनगर जिल्ह्यात उडाली खळबळ

Shrirampur lodge Found Dead body

श्रीरामपूर | Ahmednagar:  बोरीवली मुंबई येथील एका व्यक्तीचा श्रीरामपूर शहरातील एका लॉजमध्ये कुजलेला अवस्थेत असलेला मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या व्यक्तीचा मूत्यू कशामुळे झाला याचे गूढ कायम आहे. याबाबत तर्क वितर्क लावले जात होते.

श्रीरामपूर शहरातील सूर्या लॉजमध्ये बोरीवली मुंबई येथील उमर मेहबूब शेख (वय ५२) हा इसम १५ मार्च २०२२ रोजी लॉजमध्ये आला होता. मात्र तीन दिवसापासून हा इसम बाहेर आलाच नाही. या रूममधून कुजलेला असा वास येवू लागल्याने लॉजचे मालक यांनी काल सकाळी श्रीरामपूर पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी या लॉजमध्ये येवून रुमचा दरवाजा तोडून तपासणी केली असता त्याच्या रूममध्ये औरंगाबाद येथील कमाल नयन बजाज हॉस्पिटलची फाईल आढळून आली. दुसरे काही एक आढळून आले नाही. मात्र याबाबतची माहिती देण्यास लाॅज मालक व पोलिसांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला.

वैद्यकीय अधिका-यांनी मृतदेहाची तपासणी केली. त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संफर्क होवू शकला नाही  मॄतदेहाची अवस्था खूपच विचित्र झालेली होती. लाॅज परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गधी वास सुटला होती.

Web Title: Shrirampur lodge Found Dead body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here