Home Ahmednagar Live News Suicide: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Shrirampur Young man commits suicide by strangulation

Ahmednagar News Live | Shrirampur Suicide Case | श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील भोकर येथील योगेश अरविंद आहेर याने गळफास घेऊन आत्महत्या करत आपले जीवन संपविले आहे.  गळफास घेतला असता त्याला साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तो मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी साखर कामगार रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाने आत्महत्या का केली यामागील कारणाचा शोध घेत आहे. पोलीस कॉन्स्टेबल गायमुखे हे अधिक तपास करीत आहे.  

Web Title: Shrirampur Young man commits suicide by strangulation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here