Home Maharashtra News पुणे हादरले Blast and Fire: एकाच वेळी 20 सिलेंडरचा स्फोट, भीषण आगही

पुणे हादरले Blast and Fire: एकाच वेळी 20 सिलेंडरचा स्फोट, भीषण आगही

Simultaneous explosion of 20 cylinders, awful fire

Pune fire | पुणे:  पुण्यातील कात्रज परिसरात गॅस सिलेंडरचे स्फोट असल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील गंधर्व लॉन्स जवळ सिलेंडरचे स्फोट (Blast) होत आहेत. या स्फोटांमुळे भीषण आग (Fire) लागली आहे. स्फोट होतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून परिस्थिती किती भयंकर आहे याचा अंदाज घेऊ शकतो. अचानक झालेल्या या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. स्फोट इतके भीषण होते की, आवाज हा तब्बल 2 किलोमीटर दूर पर्यंत ऐकू येत होता.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटानास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आत्तापर्यंत 20 सिलेंडरचा स्फोट झाला असल्याची माहिती समजत आहे. या घटनेमुळे कुणी जखमी किंवा जिवितहानी झाल्याचं अद्याप माहिती समोर आली नाही. मात्र, या स्फोटांच्या आवाजांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमके गोडाऊन आहे की घरात ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट होत आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही पण असं म्हटलं जात आहे की, ज्या ठिकाणी हे सिलेंडरचे स्फोट होत आहेत त्या ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग सुरू होतं आणि त्याच दरम्यान गॅस लिकेज होऊन स्फोट झाले.

ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे त्या ठिकाणचे फोटोज सुद्धा समोर आले असून ते पाहून गॅस सिलेंडरचे स्फोट किती भीषण होते याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो.

किमान 20 सिलेंडरचा स्फोट झाला होता. अग्निशमन दलाची सहा वाहने आणि जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. यामध्ये एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांकडून देण्यात आली आहे.

Web Title: Simultaneous explosion of 20 cylinders, awful fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here