Home संगमनेर गिते यांच्या कार्याचा महसूलमंत्री थोरातांकडून गौरव

गिते यांच्या कार्याचा महसूलमंत्री थोरातांकडून गौरव

Somnath Gite work praised by Revenue Minister Thorat

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सोमनाथ गिते (Somnath Gite) यांनी व्यसनमुक्तीचा ध्यास घेऊन जन जागृती करण्यासाठी विपुल लेखन केले. त्यांच्या या कार्याचा गौरव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना पत्र पाठवून केला आहे.  

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्री. सोमनाथ गिते यांच्या लिखाणाचे कौतुक केले आहे. गिते यांनी मागील काही काळांपासून व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केले आहे. यामधून त्यांनी तंबाखू, सिगारेट, दारूसारख्या व्यसनाधीनतेतून समाजाचे झालेले नुकसान आणि सद्यस्थिती मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

वर्तमानपत्रे व अन्य काही माध्यमांतून त्यांनी व्यसनामुळे समाजाच्या झालेल्या नुकसानाचे भीषण वास्तव मांडले आहे. गिते हे सध्या सकाळ माध्यम समूहांसोबत जोडलेले आहेत. त्यांनी सकाळच्या माध्यमातूनही व्यसनमुक्तीवर सातत्याने लिखाण केलेले आहे. गिते यांच्या याच कामाचे कौतुक श्री. बाळासाहेब थोरात यांनी एका पत्राद्वारे करताना तुम्ही केलेल्या लिखाणाचा फायदा व्यसनमुक्त समाज घडण्यासाठी होत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका श्रीमती मुक्ता पुणतांबेकर यांनीदेखील गिते यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या कामाचे कौतुक केलेले आहे.

Web Title: Somnath Gite work praised by Revenue Minister Thorat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here