Home अहमदनगर अहिल्यानगर: जावई सासरे एकत्र दिसणार विधानसभेत, एक भाजपचा तर दुसरा….

अहिल्यानगर: जावई सासरे एकत्र दिसणार विधानसभेत, एक भाजपचा तर दुसरा….

Assembly Election 2024 Result Live: नगर जिल्ह्यातून आता सासरे आणि जावई दोघेही एकत्र विधानसभेत पाहायला मिळणार.

Son-in-law will appear together in the assembly Election Result

अहिल्यानगर: बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तर महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला आहे. नगर जिल्ह्यातून आता सासरे आणि जावई दोघेही एकत्र विधानसभेत पाहायला मिळणार आहेत.

 काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले. जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्या होत्या. यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडीला चांगले यश मिळणार असे वाटत होते. पण, महायुतीने केलेल्या मायक्रोप्लॅनिंगमुळे अहिल्यानगरमध्ये जोरदार कमबॅक केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांची आणि लोकसभा निवडणुकांची संपूर्ण कसर भरून काढली आहे. जिल्ह्यातील राहुरी आणि नगर शहर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून आता जिल्ह्यातून सासरे आणि जावई दोघेही विधानसभेत जाणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय.

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे, महाविकास आघाडीचे दिग्गज उमेदवार पराभूत झाले असून अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, येथून अजित पवार गटाचे संग्राम भैय्या जगताप यांनी विजय मिळवला आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या राहाता मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाले आहेत. या ठिकाणी त्यांना प्रभावती घोगरे यांनी चांगलीच लढत दिली. एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या संगमनेर विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून गेल्या चार दशकांपासून या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे. महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंघे (शिवसेना शिंदे गट) ४०२१ मतांनी विजयी. महाविकास आघाडीचे उमेदवार शंकराव गडाख (शिवसेना ठाकरे) यांचा पराभव. बाळासाहेब मुरकुटे यांच्यानंतर लंघे ठरले जायंट किलर. जिल्ह्यात बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Son-in-law will appear together in the assembly Election Result

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here