Home Maharashtra News शिक्कामोर्तब! अश्या होणार SSC HSC Exam

शिक्कामोर्तब! अश्या होणार SSC HSC Exam

SSC HSC Exam

SSC HSC Exam : दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळेनुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि मंडळाने आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेतच त्यांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ दिल्यामुळे परीक्षा अकरा ऐवजी साडे दहा वाजता सुरू होणार आहे. त्याअगोदर दहा मिनिटांपूर्वी विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी प्रश्नपत्रिका देण्यात येईल. अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्या विद्यार्थ्यांना काही कारणाअभावी परीक्षा देणे शक्य नसेल त्यांच्यासाठी ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पुन्हा परीक्षा होणार आहेत. असेही गोसावी यांनी स्पष्ट केले. १५ मार्च पासून दहावीची परीक्षा सुरू होणार असून ४ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च पासून ३० एप्रिल एप्रिल पर्यंत असणार आहे. ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त ३० मिनिटे तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळ विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. आतापर्यंत परीक्षेसाठी बारावीच्या १४ लाख ७२ हजार ५६२ विद्यार्थ्यांची तर दहावीच्या १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाल्याचा आकडा देखील देण्यात आला आहे.

महत्वाचे म्हणजे लसीकरणाचे बंधन विद्यार्थ्यांसाठी नसणार आहे. मात्र परीक्षेला बराच कालावधी बाकी असून पालकांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करावे असे आवाहन गोसावी यांनी केले आहे. आतापर्यंत राज्यात दहावी आणि बारावीच्या ६० ते ६५ टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Web Title : SSC HSC Exam : It is clear from the board that the 10th-12th exams in Maharashtra will be held offline only

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here