Home महाराष्ट्र प्रतापगडावर उभारणार अफझलखान वधाचा पुतळा

प्रतापगडावर उभारणार अफझलखान वधाचा पुतळा

Pratapgad: प्रतापगडावर उभारणार अफझलखान वधाचा पुतळा.

statue of Afzal Khan will be erected at Pratapgad

मुंबई: प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान परिसरातील कबर अतिक्रमण हटविल्यानंतर राज्य सरकारकडून आणखी एक पाऊल टाकण्यात येत आहे. प्रतापगडावर अफझलखान वधाचा पुतळा उभारून त्या भागात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा लाइट व साऊंड शो सुरू करण्यात येणार आहे. याविषयीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी पर्यटन सचिवांना दिले.

प्रतापगडावर अफझलखान वधाचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी शिवप्रेमी तसेच दुर्गप्रेमी संघटनांकडन करण्यात येत होती.

३५० वर्षे पूर्ण शिवरायांच्या राज्याभिषेकाला होत असून, त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हे शिवप्रताप स्मारक आणि लाइट व साऊंड शो उभारण्याचे आदेश पर्यटनमंत्र्यांकडून देण्यात आले.

साताऱ्याच्या हिंदू एकता आंदोलन संघटनेकडूनही याबाबतचे पत्र पर्यटनमंत्र्यांना देण्यात आले होते. याची दखल घेत लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा काढतानाचा पुतळा (शिवप्रताप स्मारक) उभारण्यासाठीचे आदेश पर्यटन सचिवांना दिले.

Web Title: statue of Afzal Khan will be erected at Pratapgad

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here