संगमनेरात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण, या गावात नेत्यांना बंदी
Maratha Reservation: शहर बसस्थानकासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू.
संगमनेर: संगमनेर मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा व समाजात तात्काळ आरक्षणाचे फायदे द्यावेत या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा अमरण उपोषणास बसले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने शहर बसस्थानकासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे गावात सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत वेल्हाळे गावात सर्व पक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. असे निवेदनात म्हंटले जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, तहसीलदार धीरज मांजरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनावर अनेकांच्या सह्या आहेत.
Web Title: strike for Maratha reservation in Sangamner, leaders banned
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App