Home अहिल्यानगर प्रेमप्रकरणाची चर्चा केल्याने विवस्त्र करून केली मारहाण

प्रेमप्रकरणाची चर्चा केल्याने विवस्त्र करून केली मारहाण

Ahmednagar Crime: सारसनगर येथील प्रकार (love affairs) : तिघांवर कोतवालीमध्ये गुन्हा दाखल.

Stripped and beaten for discussing love affairs

अहमदनगर : प्रेम प्रकरणाची चर्चा का करतोस, असे म्हणत दोघांना विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना सारसनगर परिसरात १८ ऑक्टोबर २०२२ रोजी घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी (दि.११) कोतवाली पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर छबुराव कांडेकर, प्रतीक शिरसाठ, रोहित इवळे (सर्व रा. तुळजाभावनी कॉलनी, सारसनगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे.

मयूर याने फोन करून दोघा मुलांना बोलावून घेतले व तु आमच्या प्रेम प्रकरणाची चर्चा करतोस, असे म्हणत विवस्त्र करून केली. मारहाणीचे मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर ही मुले घरी निघून गेली. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी एकाने मारहाण केल्याचा व्हिडीओ मुलांना दाखिवला. हा प्रकार मुलांनी घरी सांगितला. घरच्यांशी चर्चा करून अल्पवयीन मुलाने कोतवाली पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. मारहाण करणाऱ्या तिघा आरोपींवर भादंवि कलम ३२४, ३२३,४२७, ५०४, ५०६ नुसार का गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Stripped and beaten for discussing love affairs

See Latest Marathi NewsAhmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here