अहमदनगर: विद्यार्थी विद्यार्थिनीची कॅफेत अश्लील चाळे, पोलिसांचा छापा
Breaking News | Ahmednagar: शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींचे अश्लिल चाळे सुरु असल्याची माहिती, पोलिसांचा छापा.
अहमदनगर: शाळा-कॉलेजच्या मुला-मुलींचे अश्लिल चाळे सुरु असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी मिळाली त्यानुसार नगर शहरात सावेडीत मोठी करवाई केली.
असे कृत्य करण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून देणाऱ्या सावेडी उपनगरातील दोन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी शुक्रवारी (दि.२६) सायंकाळी छापेमारी केली. कॅफे चालकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले असून तेथे अश्लिल चाळे करताना पकडलेल्या मुला-मुलींना समज देऊन सोडून देण्यात आले आहे.
मनमाड रस्त्यावरील एका कॅफेत तसेच ताठे नगरयेथील एका कॅफेत शाळा कॉलेजच्या मुला मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे तोफखान्याचे पो. नि. आनंद कोकरे यांनी पोलिस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदारांच्या २ टीम तयार करून छापे टाकले.
या ठिकाणी कॅफेच्या नावाखाली प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून, पडदे लावुन अंधार करून मुला मुलीना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे समोर आले. दोन्ही ठिकाणी अनेक मुले मुली आढळून आल्या, त्यांना समज देवून सोडून देण्यात आले. शिरीष शरद संसारे (रा. भगवानबाबा चौक, निर्मलनगर) याच्याविरुद्ध पो. कॉ. बाळासाहेब भापसे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला तर ओंकार कैलास ताठे (रा. ताठेनगर, सावेडी) याच्या विरुद्ध पो. कॉ. दत्तात्रय कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Student’s sexual harassment in cafe, police Raid
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study