ठाण्यात शिंदे गटातील उपशाखाप्रमुखाची हत्या, तिघांना अटक
Thane Crime: शिंदे गटाचे उपशाखा प्रमुख यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या (Murder) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ठाणे : वसंत विहार भागातील शिंदे गटाचे उपशाखा प्रमुख अक्षय ठुबे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चितळसर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
अक्षय ठुबे हे वसंत विहार येथील धर्मवीर नगर परिसरात राहतात. ते शिंदे गटात असून तेथील उपशाखा प्रमुख आहेत. मंगळवार पासून ते बेपत्ता होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी चितळसर पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. बुधवारी रात्री अक्षय यांचा मृतदेह कोकणीपाडा परिसरातील जंगलात आढळला.
त्यांनतर पोलिसांनी तपास करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता अक्षय यांनी त्यांना साडेतीन लाख रुपये दिले होते. पैशांचा तगादा अक्षय करू लागल्याने त्यांनी अक्षय यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
Web Title: Sub-branch chief of Shinde group Murder in Thane, three arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App