Home पुणे दहा हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक ताब्यात

दहा हजारांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक ताब्यात

Pune Bribe Case: गुन्ह्यात अटक न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात.

Sub-inspector of police detained while taking bribe of ten thousand

पुणे: एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना एका पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३१) ताब्यात घेतले. या उपनिरीक्षकाविरुध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद दशरथ कणसे असे गुन्हा दाखल केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. कणसे हडपसर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुध्द कोलकता येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट बजावले आहे. कणसे यांनी तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला अटक न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी पाच हजार रुपये अगोदर घेतले.

उर्वरित २० हजार रुपये न दिल्यास अटक करण्याची धमकी दिली, असा अर्ज तक्रारदाराने दिला होता. त्यावर ‘लाचलुचपत’च्या अधिकाऱ्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात सापळा रचून कणसे यांना लाच घेताना ताब्यात घेतले, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Sub-inspector of police detained while taking bribe of ten thousand

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here