Home Akole News मुंडके नसलेलं धड विहिरीत आढळून आल्याने अकोले तालुक्यात खळबळ

मुंडके नसलेलं धड विहिरीत आढळून आल्याने अकोले तालुक्यात खळबळ

Suicide Akole taluka as a headless body was found in a well News

अकोले | Suicide: अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील एका शेतकऱ्याने विहिरीत गळफास घेतल्याने गळफास घेताना दोरीने मुंडके बाजूला आणि धड दुसऱ्या बाजूला झाले अशी विचित्र घटना घडली. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

भाऊसाहेब दाजीबा तोरमल (वय ४५ वर्ष ) रा.पिंपळगाव निपाणी ता. अकोले जि. अहमदनगर असे या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे आहे रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.  या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी ही माहिती पोलीस पाटिल यांना  दिली त्यांनी  पोलीस यंत्रणाकडे तात्काळ खबर दिल्यानंतर सर्व यंत्रणा या घटनास्थळी हजर झाली होती. मयत भाऊसाहेब तोरमल याचे घर या विहिरीपासून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे रविवारी दुपारी ३ वाजता मयत व्यक्तीचे मुंडके नसलेले शरीर बाहेर काढण्यात आले . मात्र त्याचे मुंडके शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यासाठी विहिरीचे पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे पाण्याचा उपसा झाल्यानंतर मयत तोरमल याच्या मुंडक्या चा शोध लागणार आहे

अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सुमारे 60 ते 70 फूट खोल असणाऱ्या विहिरीत 40 फूट पाणी असून या पाण्यात त्याचे मुंडके शोधण्याचे काम सुरू आहे मुंडके नसलेले शरीर पाण्यातून वर काढले असून ते शरीर ग्रामीण रुग्णालय अकोले येथे तपासणीसाठी ठेवले असल्याचे अकोल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी सांगितले

रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घराच्या जवळच असणाऱ्या विहिरीकडे गेले विहिरीच्या कठड्याला एक नायलॉन दोरी बांधली. आणि आपल्या गळ्यात अडकविली त्यानंतर विहिरीच्या कठड्यावरून थेट विहिरीत उडी मारली विहिरीत उडी मारताच गळफासच्या दोरीने त्याचे मुंडके आणि मुंडके नसलेले शरीर असे दोन तुकडे झाले गळफासाची दोरीने त्याचा गळा कापल्यामुळे शरीराचे दोन भाग झाले आणि विहिरीत पडले आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे अंगात फक्त अंतवस्त्र होते

पाण्यात आवाज झाल्याने पत्नीने धाव घेतली असता पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती तिला समजली तिने आरडाओरडा केला असता स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली

मयत तोरमल यांचा मृतदेह दुपारी तीन वाजता विहिरीतून बाहेर काढला असून त्याचे मुंडके नसलेले शरीर पोलिसांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी उत्तरीय तपासणीसाठी ठेवले आहे  मात्र त्याचे मुंडके  विहिरीतून अद्याप  काढता नाही विहिरीत 30 ते 40 फूट पाणी असल्याने विहिरीतील पाणी उपसा करण्याचे काम सुरू आहे आहे मुंडके मिळाल्यानंतरच त्याच्या शरीराचा शवविचेदन करता येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Suicide Akole taluka as a headless body was found in a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here