संगमनेरच्या पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Breaking News | Sangamner: शहर पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शिर्डी येथे आपल्या राहत्या घराच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर.
संगमनेर: शहर पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने शिर्डी येथे आपल्या राहत्या घराच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर शिर्डीच्या साईनाथ सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
गणेश वाळके असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. वाळके यापूर्वी शिर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून शिर्डीतील भन्साळी स्क्वेअर इमारतीत राहत होते. या राहत्या घराच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
जखमी अवस्थेत वाळके यांना शिर्डीच्या श्री साईनाथ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पोलीस कर्मचारी वाळके यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
Web Title: Suicide attempt of Sangamner policeman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News