Home महाराष्ट्र Suicide: वडिलांनी अभ्यास करायला सांगितल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने 19 व्या मजल्यावरुन टाकली उडी
Suicide: वडिलांनी अभ्यास करायला सांगितल्याने दहावीच्या विद्यार्थ्याने 19 व्या मजल्यावरुन टाकली उडी
ठाणे: ठाण्यातील निळकंठ वूडसमधील ओलिविया या इमारतीच्या 19 व्या मजल्यावरुन स्वत:ला झोकून देत ओम मनिष मिश्रा (15) या दहावीतील विद्याथ्र्याने आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणाऱ्या ओम याची सध्या शालांत परीक्षा सुरु होती. तो 26 मार्च रोजी विज्ञानाचा पेपर देऊन घरी परतला हाता. काही वेळाने त्याला वडिलांनी अभ्यास कर, सांगितले. या रागातून त्याने आई वडीलांसमोरच थेट 19 व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केली.
Web Title: Suicide by a tenth student